Home पुणे मोदी सरकारने ओबीसी बांधवांच्या पाठीत खंजीर खुपसला; राष्ट्रवादीचा आरोप

मोदी सरकारने ओबीसी बांधवांच्या पाठीत खंजीर खुपसला; राष्ट्रवादीचा आरोप

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारच्या ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशाला स्थगिती दिली आहे. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून केंद्र सरकारवरच्या निषेधार्थ आज पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आलं.

राष्ट्रवादी काँग्रेसने आज मोदी सरकारमधील खासदार, पुणेकरांचे संसदेतील प्रतिनिधी असलेल्या खासदार गिरीश बापट यांच्या कार्यालयासमोर शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलं.

हे ही वाचा : “पवार साहेबांनी नेमला शिवसेनेचा नवीन कामगार प्रमुख”

ओबीसींच्या आरक्षणासाठी महत्त्वाचा असलेला इम्पेरिकल डेटा मोदी सरकारने सादर न केल्याने सर्वोच्च न्यायालयाने केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरातील अनेक राज्यांतील ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिली आहे. जानेवारी 2014 मध्ये मोदी सरकार सत्तेत येण्यापूर्वी डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारने ओबीसींचे इम्पेरिकल डेटा स्वीकारून ओबीसी आरक्षण अबाधित राखले होते. मात्र, मे 2014 मध्ये देशातील जनतेची फसवणूक करून मोदी सरकार सत्तेत आले आणि या सरकारने इम्पेरिकल डेटामध्ये त्रुटी दाखवून ओबीसी आरक्षणाच्या मार्गात काटे रोवले.

नरेंद्र मोदींच्या या कृतीमागे भाजपा आणि आरएसएसची मनधरणी करणारी वृत्ती आहे. या देशात ओबीसी आणि दलितांची प्रगती होत आहे, ही बाब भाजपाला नेहमीच खटकते. महाराष्ट्रातील ओबीसी बांधवांचे आरक्षण पुढे ढकलण्यासही भाजपाच जबाबदार आहे. असा आरोप प्रशांत जगताप यांनी केला आहे.

दरम्यान, अवधूत वाघ नावाच्या व्यक्तीने ओबीसी आरक्षणाला औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिलं. अवधूत वाघ हे भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आणि राज्य प्रवक्ता आहे. फडणवीस सरकार असताना, तसेच राज्यात भाजपाची सत्ता असताना भाजपाचा पदाधिकारी असलेल्या अवधूत वाघ यांनी ओबीसी आरक्षणाला आव्हान दिले, हा केवळ योगायोग नाही, तर हा भाजपाचा जाणीवपूर्वक रचलेला डाव आहे. भाजपाने ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, असं प्रशांत जगताप यांनी यावेळी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

माझं उत्तर ऐकून चंद्रकांत पाटलांची प्रकृती बिघडेल; संजय राऊतांचा खोचक टोला

“मोठी बातमी! हेलिकाॅप्टर दुर्घटनेत सीडीएस बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू”

“शरद पवार पंतप्रधान व्हावेत, ही प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा”