मुंबई : कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जात असताना भारताला जगभरातील 40 देशांकडून मदत पुरवण्यात येत आहे. मात्र केंद्रातले मोदी सरकार ती मदत केवळ भाजप शासित राज्यांना देत असून महाराष्ट्राशी भेदभाव केला जात असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.
सचिन सावंत यांनी एका गुजराती वृत्तपत्रातील आलेल्या माहितीच्या आधारे मोदी सरकारवर आरोप केला आहे. सचिन सावंत यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे.
40 देशांच्या आंतरराष्ट्रीय मदतीतही मोदी सरकार महाराष्ट्राशी भेदभाव करत आहे. प्रथम ते या मदत सामुग्रीवर बसून राहिले. वितरण सुरू केले तेव्हा महाराष्ट्र या यादीत नाही. भाजपा शासित युपी, बिहार,एमपी, हरियाणा, गुजरात इ.राज्ये आहेत. देवेंद्र फडणवीस जी उत्तर द्या! मोदी सरकारचा जाहीर निषेध, असं म्हणत सचिन सावंत यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
सदर आंतरराष्ट्रीय मदतीवर राज्य सरकारांचाही हक्क असताना ती थेट राज्यांना का दिली जात नाही? केवळ केंद्रीय यंत्रणांकडून त्याचे होणारे वाटप हे पीएम केअर प्रमाणे मोदींच्या हातात अमर्याद अधिकार देणारे आहे तसेच ते संघराज्य पध्दतीला छेद देणारे ही आहे., अशी टीकाही सचिन सावंत यांनी यावेळी केली.
सदर आंतरराष्ट्रीय मदतीवर राज्य सरकारांचाही हक्क असताना ती थेट राज्यांना का दिली जात नाही? केवळ केंद्रीय यंत्रणांकडून त्याचे होणारे वाटप हे #PMCares प्रमाणे मोदींच्या हातात अमर्याद अधिकार देणारे आहे तसेच ते संघराज्य पध्दतीला छेद देणारे ही आहे.
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) May 7, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“ज्या पतीला वाचवण्यासाठी लता करे अनवाणी धावल्या, त्या पतीला कोरोनानं हिरावलं”
“उद्धव ठाकरेंची महाविकास आघाडीत घुसमट होत आहे, आज ना उद्या ते नक्की आघाडीतून बाहेर पडतील”
“आरोग्य विभागात भरती करण्याचा निर्णय आता घेतला जातोय, वर्षभर ठाकरे सरकार झोप काढत होतं का?”
“अशोक चव्हाणांना कायदा कळत नाही, त्यामुळे ते मराठा आरक्षणाच्या बाबतीत वेड पांघरून पेडगावला जात आहे”