मोदी तुम्हाला गुरु मानतात; यावर शरद पवार म्हणाले…

0
156

मुंबई : महाविकास आघाडीचे जनक आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये संजय राऊतांनी शरद पवारांना एक प्रश्न विचारला त्या प्रश्नावर शरद पवार हसले आणि त्यांनी त्या प्रश्नाचे उत्तर दिले.

मोदी तुम्हाला गुरु मानतात, त्यांना तुम्ही अर्थव्यवस्था सावरण्यासंदर्भात काही सल्ला द्याल ? असा प्रश्न विचारताच शरद पवार खळाळून हसले आणि म्हणाले, मोदी तुम्हाला गुरु मानतात असं म्हणून तुम्ही मलाही अडचणीत आणू नका आणि मोदींनाही अडचणीत आणू नका. राजकारणात कुणीही कुणाचा गुरु नसतो, असं शरद पवार यांनी म्हटलं.

दरम्यान, सोयीची भूमिका आम्ही लोक एकमेकांच्या संदर्भात मांडत असतो. अलिकडे त्यांची माझी काही भेट झालेली नाही. कोरोनाचं संकट आल्यानंतर मोदींनी ज्या सर्वपक्षीय बैठका घेतल्या त्यामध्ये त्यांच्याशी जो संवाद झाला त्यापलिकडे त्यांचा माझा संवाद नाही, असंही शरद पवार म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

अभिनेत्री रेखा यांच्या बंगल्यात कोरोनाचा शिरकाव; पालिकेने केला बंगला सील

बिग बी अमिताभ बच्चन यांच्या नंतर अभिषेकसुद्धा कोरोना पॉझिटिव्ह

अमिताभ बच्चन यांना कोरोना; नानावटी रुग्णालयात केलं दाखल

विजयी उमेदवारांच्या यशात शिवसेना-भाजपचा वाटा; राष्ट्रवादी-काँग्रेसचे योगदान नाही- सुधीर मुनगंटीवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here