नवी दिल्ली : एक मोठी बातमी समोर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे.
शेतकऱ्यांना आम्ही समजावण्यात कमी पडलो आहोत. त्यामुळे आम्ही देशवासियांची माफी मागत आहोत असं म्हणत शेतकऱ्यांनी आता आंदोलन संपवून आपल्या घरी जावं, असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं. पंतप्रधान मोदींनी आज प्रकाश पर्व सोहळ्याचं निमित्त साधून देशाशी संवाद साधला.
हे ही वाचा : “एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी अनिल परब-फडणवीस चर्चा; तोडग्याचा फाॅर्म्युला परब देणार”
कायद्याच्या ज्या तरतूदीवर त्यांचा अक्षेप होता. तो बदलायला आम्ही तयार होतो. आम्ही दोन वर्षासाठी कायदे सस्पेंड करण्याचाही निर्णय घेतला. मी देशाची क्षमा मागून पवित्र मनाने हे सांगतो की आमच्या तपस्येत काही कमी पडली असेल. आम्ही काही सत्य काही शेतकऱ्यांना समजावू शकलो नाही. आज प्रकाशपर्व आहे. यावेळी कोणालाही दोष देण्याची ही वेळ नाही. आम्ही तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे., असं मोदी म्हणाले.
दरम्यान, या महिन्याच्या अखेरीस संसदेच्या अधिवेशनात ही कायदे रिपील करण्याची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत, असं सांगतानाच शेतकऱ्यांनी आता आंदोलन करू नये. त्यांनी आपआपल्या घरी जावं. शेतावर काम करावं, असं आवाहन मोदींनी केलं.
महत्वाच्या घडामोडी –
कंगणा हलकट बाई, तिनं सत्ताधाऱ्यांचे पाय चाटून पद्मश्री घेतलाय; शिवसेनेचा हल्लाबोल
“राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग; मावळमधील भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश”
“नाना पटोले यांच्या पाठोपाठ आता बाळासाहेब थोरातही फडणवीसांच्या भेटीला; राजकीय हालचालींना वेग”