आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
कोल्हापूर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्यापासून कोकण दौऱ्यावर आहेत. याआधी आज त्यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुंबई महापालिका स्वतंत्र लढणार, असे सांगितले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज तब्बल 5 वर्षांनंतर कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्याला कार्यकर्ते आणि कोल्हापूरकरांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
हे ही वाचा : एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटाला मोठा धक्का; ‘या’ मोठ्या नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
राज ठाकरे कोल्हापूरमध्ये दाखल होताच ताराराणी चाैकात जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी राज ठाकरे यांनी महाराणी ताराराणी यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. त्यानंतर ताराराणी चौक ते विश्रामगृहापर्यंत बाईक रॅली काढण्यात आली. बाईक रॅलीनंतर राज ठाकरे कोल्हापुरातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. त्यामुळे या बैठकीत राज ठाकरे कार्यकर्त्यांना काय कानमंत्र देतात, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
“भाजपचा राष्ट्रवादीला दे धक्का; ‘या’ महिला नेत्यानं केला भाजपमध्ये प्रवेश”
“काँग्रेसची यशस्वी खेळी! भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं केला काँग्रेसमध्ये प्रवेश”
“भर पत्रकार परिषदेत बोलताना, उदयनराजेंना अश्रू अनावर, म्हणाले, मेलो असतो तर बरं झालं असतं…”