Home महाराष्ट्र मराठवाड्यात मनसेची जोरदार मोर्चेबांधणी; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर घेणार ‘ही’ आक्रमक भूमिका

मराठवाड्यात मनसेची जोरदार मोर्चेबांधणी; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर घेणार ‘ही’ आक्रमक भूमिका

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

औरंगाबाद : आगमी जिल्हापरिषद आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जय्यत तयारी केली आहे. अतिवृष्टी, पुरामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे आता ओल्या दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी करत आहे.

मराठवाड्यात गेल्या काही महिन्यांपासून संघटना बांधणीवर भर दिला जात आहे. जे पदाधिकारी सक्रीय आहेत, त्यांच्यावर पक्ष बांधणीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. गावागावात मनसेची शाखा सुरु करण्याच्या सूचना पक्षाकडून देण्यात आल्या आहेत.

हे ही वाचा : उद्धव ठाकरे म्हणाले सरकार पाडून दाखवा; देवेंद्र फडणवीस म्हणाले…

तालुकास्तावर 15 शाखांचे लक्ष्य देण्यात आलं असून जे काम करणार नाहीत, त्यांना पदावरून बाजूला करण्यात येणार असल्याचं पदाधिकाऱ्यांना बजावण्यात आले आहे. प्रमुख पक्षापेक्षा मनसे शेतकऱ्यांसाठी आक्रमक होत निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न करत आहे.

महत्वाच्या घडामोडी –

शिवसेना वाघाचा मुखवटा लावलेली मेंढी आहे; रावसाहेब दानवेंची बोचरी टीका

महाविकास आघाडीचे सरकार पडेल की नाही यातून बाहेर पडा, अन्…; पंकजांचा भाजपला घरचा अहेर

मनसेचं महाविकास आघाडी सरकार निषेधात आंदोलन; केलं रावणरुपी आघाडी सरकरच्या पुतळ्याचं दहन