आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नाशिक : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जय्यत तयारी केली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे आजपासून नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात नाशिक महापालिकेसह जिल्ह्यात मनसेच्या वर्चस्वासाठी स्वतः पक्षसंघटनेत मोठे फेरबदल करणार असल्याची माहिती मिळाली आहे.
आगामी महापालिका निवडणुकीसाठी यापूर्वी राज ठाकरे, अमित ठाकरे आणि पक्षांच्या इतर नेते नाशिकमध्ये मुक्कामी होते. आता पुन्हा एकदा राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते शाखा अध्यक्षांच्या नियुक्त्या करणार आहे. मनसेमध्ये शाखा अध्यक्ष हे सर्वात महत्त्वाचे पद असून, गेल्या महिन्यापासून या निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
पक्षाचे तरुण नेतृत्व अमित ठाकरे बाळासाहेब नांदगावकर, नितीन सरदेसाई यांनी मंगळवारी राजगडावर शाखा अध्यक्षाच्या यादीवर शेवटचा हात फिरवला. यावेळी इच्छुकांशी संवाद साधला. या बैठकीसाठी मनसेचे प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष रतनकुमार ईचम, जिल्हाध्यक्ष अनंत सूर्यवंशी उपस्थित होते.
महत्वाच्या घडामोडी –
भाजपचे अनेक नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचा दावा
‘संजय राऊतांनी आता राजकारण सोडावं’; चंद्रकांत पाटलांची खोचक टीका
पालकमंत्री उदय सामंत हे कोकणातील शक्ती कपूर; नितेश राणेंची टीका
भाजपला मोठा दिलासा; 12 निलंबित आमदारांबाबत निवडणूक आयोगाचा ‘हा’ मोठा निर्णय