आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
ठाणे : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मनसेनं जोरदार कंबर कसली असून काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता मनसेनं आगामी निवडणूकीसाठी मोर्चेबांधणीला सूरूवात केली आहे.
मनसेनं आता दिव्यात लक्ष केंद्रीत केलं आहे. दिव्यात आता मनसेनं ‘एकला चलो रे’ चा नारा दिला आहे. दिव्यात शिवसेनेनं भाजपचा सुफडा साफ केल्यानंतर आता मनसेनं जोरदार तयारीला सुरूवात केली आहे. त्यामुळे दिव्यात आता मनसेचे 1 ते 2 उमेद्वार निवडणून येऊ शकतात, अशी प्रतिक्रिया मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली.
हे ही वाचा : नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप, म्हणाले…
दरम्यान, आम्ही पूर्ण ताकदीने निवडणूक लढणार आहोत. त्यासाठी छोट्या घटकांना एकत्र घेण्याची तयारी आम्ही केली आहे. त्यामुळे आम्हाला कोणीही कमी लेखू नये, असा इशारा अविनाश जाधव यांनी यावेळी दिला.
महत्वाच्या घडामोडी –
मनसेच्या कार्यक्रमाचा स्टेज कोसळला; राज ठाकरे स्टेजवर असतानाच घडला प्रकार
उद्धव ठाकरे तुमच्यात हिंमत असेल तर मला अटक करा; किरीट सोमय्यांचं मुख्यमंत्र्यांना आवाहन
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 365 दिवस साजरी व्हायला हवी- राज ठाकरे