कोरोना रूग्णांच्या मदतीला धावणाऱ्या मनसेच्या ‘या’ नेत्याला 2 वर्षे तडीपारची शिक्षा

0
160

ठाणे : मनसेचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना तब्बल दोन वर्षासाठी तडीपार होण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. अविनाश जाधव यांना मुंबई, ठाणे, ठाणे ग्रामीण, नवी मुंबई आणि रायगड या पाच जिल्ह्यांमधून हद्दपार करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. वसई पालिका आयुक्त दालन आंदोलन प्रकरणी ही नोटीस धाडण्यात आली आहे.

विरारच्या उपविभागीय पोलीस अधिकारी रेणुका बागडे यांनी अविनाश जाधव यांना स्पष्टीकरण देण्यासाठी 4 ऑगस्टला विरारमधील कार्यालयात हजर राहण्यास सांगितलं आहे. तडकाफडकी नोटीस बजावल्यानंतर ठाणे खंडणी विभागाने अविनाश जाधव यांना ताब्यात घेतलं आहे. महापालिकेच्या कोव्हिड रुग्णालयात नर्स म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढल्या प्रकरणी मनसे महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन करत असताना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

मी गेली अनेक वर्ष लोकांसाठी आंदोलन करतोय. कोणतंही आंदोलन मी स्वत:साठी केलेलं नाही. वसईतही जे आंदोलन केलं होतं ते कोव्हिड सेंटरसाठी होतं. आजही विदर्भ, मराठवाडा, सांगली, सातारा येथून आलेल्या मुलींसाठी आंदोलन करत आहे. आंदोलन सुरु असतानाच मला तडीपारीची नोटीस आली आहे, अशी माहिती अविनाश जाधव यांनी फेसबुकला व्हिडिओ शेअर करत दिली.

महत्वाच्या घडामोडी-

“कोकणातील जनतेच्या असंतोषाची किंमत शिवसेनेला मोजावी लागेल”

हे सरकार फार काळ टिकेल असं वाटत नाही- राज ठाकरे

भाजपासोबत जाण्याची वेळ गेली…; चंद्रकांत पाटलांनी केलेल्या विधानाला शिवसेनेचं उत्तर

पुण्यातील कोरोना रोखण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही; अजित पवारांचा शब्द

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here