Home महाराष्ट्र “मनसेचा कर्नाटक सरकारला थेट कानडीतून इशारा”

“मनसेचा कर्नाटक सरकारला थेट कानडीतून इशारा”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची कर्नाटकात विटंबना झाली. या घटनेचे देशभर पडसाद उमटत आहेत. मनसेनेही या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी तर थेट कानडीतूनच कर्नाटक सरकारला इशारा दिला आहे.

(छत्रपती शिवाजी महाराजजरा एसरन्नो अपमान माडवेड) मराठी माणूस छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमना कदापिही सहन करणार नाह, असा इशाराच सदीप देशपांडे यांनी दिला आहे. संदीप देशपांडे यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना असा इशारा दिला.

हे ही वाचा : नगरपरिषदेत शिवसेनेचा धुव्वा उडणार, त्यामुळे…; नारायण राणेंचा शिवसेनेला इशारा

निम्म वडागीन राजकारणं द सलवागी, छत्रपती शिवाजी महाराजजरा एसरन्नो अपमान माडवेडी, अदन्न नाव यावागलो, सहस्सोदिला, मानंगिला न्यूतुळकळी, असं संदीप देशपांडे म्हणाले आहेत.

दरम्यान, महाराजांचा अपमान कधीही सहन केला जाणार नाही. हे त्यांनी समजून घ्यावं. कर्नाटकमध्ये दोन पक्षाचं जे अंतर्गत राजकारण सुरू आहे. त्या अंतर्गत राजकारणात महाराजांचा झालेला अपमान मराठी माणूस कधीही सहन करणार नाही हे लक्षात ठेवा, असा याचा अर्थ होतो.

कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या वाणीवर कंट्रोल ठेवावा अन्यथा मनसे त्यांच्यावर कंट्रोल ठेवेल, असा इशाराही देशपांडे यांनी यावेळी दिला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“राज्यभरातील शिवरायांच्या प्रत्येक पुतळ्याला दुग्धाभिषेक घातला जाणार; जयंत पाटलांची मोठी घोषणा”

“पुण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतली भाजप आमदाराची भेट; मनसे-भाजप युती होणार?”

“नारायण राणे ज्या पक्षात जातात, त्यांची सत्ता जाते, त्यामुळे भाजपलाही धोका होऊ शकतो”