Home महाराष्ट्र आगामी महापालिकांमध्ये मनसेला किंग बनायचंय, किंग मेकर नाही; राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश

आगामी महापालिकांमध्ये मनसेला किंग बनायचंय, किंग मेकर नाही; राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आज मनसेची ‘शिवतीर्थ’ वर महत्त्वपूर्ण बैठक झाली.

आजच्या बैठकीला मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अमेय खोपकर, शिरीष सावंत, संदीप देशपांडे या प्रमुख नेत्यांची उपस्थिती, तसेच मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे आणि कल्याण-डोंबिवलीतील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. या बैठकीनंतर बाळा नांदगावकर यांनी माध्यमांशी संवाद साधला.

आजच्या या बैठकीत कार्यकर्त्यांची टीम स्थापन करून या टीम महापालिकांच्या निवडणुकीबाबत अहवाल सादर करतील, याबाबतचा निर्णय घेण्यात आली असल्याची माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली. तसेच महापालिकांमध्ये मनसेला आता किंग बनायचं आहे, किंगमेकर नाही, असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले असल्याची माहिती बाळा नांदगावकर यांनी यावेळी दिली.

हे ही वाचा : किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ला महागात पडेल; चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला इशारा

दरम्यान, राज ठाकरे यांनी नेते मंडळी, सरचिटणीस आणि प्रमुख 60 ते 65 पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकीची तयारी प्रत्येक ठिकाणी जाऊन कशी करायची, त्याची सर्व माहिती आणि सूचना दिल्या. कुठल्या विभागात कोणती टीम जाणार याची यादी रात्रीपर्यंत देण्यात येणार आहे. तसेच या यादीसोबत तिकडे जाऊन काय काम करायचे त्याची लेखी स्वरूपात माहिती देण्यात येणार आहे. टीमच्या अहवालानंतर निवडणुकीची तयारी करण्यात येणार आहे. 14 तारखेपर्यंत आता जी पुनर्रचित वॉर्डरचना झाली आहे, त्यामध्ये आपल्याला काही सूचना करायच्या आहेत का? घ्यायच्या आहेत का? त्यासुद्धा कराव्यात, अशा सूचनाही राज ठाकरे यांनी यावेळी दिल्या असल्याचं नांदगावकर यांनी यावेळी सांगितलं.

महत्वाच्या घडामोडी –

“शिवसेनेचा भाजपला दणका; ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन”

मुंबईत पर्यटनाला मिळणार चालना, दादर चौपाटीच्या धर्तीवर ‘व्ह्युवींग डेक’ उभारणार- आदित्य ठाकरे

मनसेचं मिशन पुणे; राज ठाकरेंच्या उपस्थितीत ‘शिवतीर्थ’ वर महत्वपूर्ण बैठक