पुणे मनसेला पुन्हा हादरा; ‘या’ नेत्याचा पक्षाला रामराम

0
1299

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : पुण्यातील मनसेच्या माथाडी कामगार सेनेचे माजी शहराध्यक्ष निलेश माझीरे यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे.

निलेश माझीरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ करण्याचा निर्णय घेतला आहे. माझीरे हे मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. वसंत मोरे पक्षात साईडलाईन झाल्यानंतर मनसेला हा पुण्यातील मोठा धक्का मानला जात आहे.

हे ही वाचा : “…पण असा घाबरणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला परवडणार नाही”

“मी आज पक्ष सोडण्याचं मुख्य कारण म्हणजे मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर आणि राज्य सरचिटणीस बाबू वागस्कर तसेच कोअर कमिटीतील इतर सदस्य आहेत” असं सांगत माझिरे यांनी म्हंटलं आहे.

“19 मे रोजी मी मनसे सोडणार असल्याच्या बातम्या काही माध्यमांत आल्या होत्याय त्यानंतर माझिरे यांची हकालपट्टी करा असं साईनाथ बाबर म्हणाले होते. तर बाबू वागस्कर यांनी तू पक्षात राहणार आहेस का? अशी विचारणा केली होती. मला बोलावून घेऊन विचारता तुम्ही पक्षात राहणार आहात का? असं म्हणत हुकूमशाहीच सुरु असल्याचा आरोप निलेश माझीरे यांनी यावेळी केला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

BMC निवडणुकीच्या तोंडावर डॅशिंग नितीन नांदगावकर यांच्यावर शिवसेनेने सोपविली ‘ही’ मोठी जबाबदारी

बॅग भरून जेलमध्ये जायला ही काही सहल नाही; अनिब परब यांचं किरीट सोमय्यांना जोरदार प्रत्युत्तर

राष्ट्रवादीचा भाजपाला मोठा धक्का; भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here