“नागपुरातही मनसेचा झंझावात, अनेकांनी हाती धरला मनसेचा झेंडा”

0
911

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नागपूर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षसंघटना मजबूत करण्यावर भर दिला आहे. अशातच आता नागपूरमध्येही अनेक नागरिकांनी मनसेमध्ये प्रवेश केला आहे.

हे ही वाचा : शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या ‘त्या’ नगरसेवकांवर भाजपा आमदारांनी व्यक्त केली खंत

महाराष्ट्र नवनिर्माण सेना नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा विभाग अध्यक्ष तुषार गिऱ्हे यांच्या छत्रपती नगर परिसरातील मनसे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मनसे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी अनेकांनी मनसेचा झेंडा हाती घेतला.

दरम्यान, यावेळी हेमंत गडकरी यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे विचार जनतेने स्वीकारले आहेत. मनसे सत्तेसाठी नाही तर सामान्य माणसांच्या हितासाठी लढा देणारा पक्ष आहे. यामुळे अनेक नागरिक पक्षात सामील होत आहेत. तसेच आज पक्षात ज्यांनी प्रवेश केला त्या सर्वांचे अभिनंदन तसेच सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा हेमंत गडकरींनी यावेळी दिल्या.

महत्वाच्या घडामोडी –

‘नाथाभाऊ मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होत आहेत, म्हणून गिरीश महाजनांना मोठं केलं’; एकनाथ खडसेंचा निशाणा

महाविकास आघाडी सरकारला आता अवघे काही दिवस उरले आहेत- चंद्रकांत पाटील

सचिन तेंडुलकर राज ठाकरेंच्या भेटीसाठी ‘शिवतिर्थ’वर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here