आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना पुन्हा एकदा आमने -सामने आले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना आणि भारतीय कामगार सेना यांच्यात संघर्ष पेटला असून दोन्ही पक्षांचे पक्षश्रेष्ठी यावर काही पाऊल उचलणार का ? याकडं सर्वांचे लक्ष लागले आहे.
पवई येथील L&T या कंपनीतील कामगारांच्या समस्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना सोमवारी कंपनीत दाखल झाली. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे चिटणीस केतन नाईक, विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली आणि रोहन सावंत आपल्या सहकाऱ्यांसमवेत कंपनीत पोहोचले होते, अशी माहिती मिळाली आहे.
हे ही वाचा : “गोव्यातील प्रत्येक कामात भ्रष्टाचार झालाय, किरीट सोमय्याजी गोव्याची पकडा, गोवा युझ काॅलींग फाॅर यु”
कामगारांच्या समस्या मांडून मनसेची कामगार सेना कंपनीतून बाहेर पडल्यानंतर शिवसेनेच्या कामगारांनी काही कामगारांना एकट्यात पाहून वाद घातला. यानंतर मनसेनेही आक्रमक पवित्रा घेत आपल्या कामगारांना घेऊन थेट पवई पोलिस ठाणे गाठले.
दरम्यान, या कामगारांसोबत कंपनीतील मालकांकडून गैरव्यवहार केला जात होता. पण आता राजकीय पक्षांकडून कामगारांवर असे अत्याचार होत असतील त्याला जबाबदार कोण? असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे. कामगारांच्या हक्कांसाठी लढणारे मनसे आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष समोरासमोर आल्याने याबाबत दोन्ही पक्षाचे पक्षश्रेष्ठी कोणता निर्णय घेतील याकडे पाहावे लागले.
महत्वाच्या घडामोडी –
“शिवसेनेशी केलेली बंडखोरी भोवणार, माथेरानमधील ‘त्या’ नगरसेवकांचा आज लागणार निकाल”
ज्या शिवसेनेनं केलाय घात, त्यांचा…; भाजप उमेद्वाराच्या प्रचारात रामदास आठवलेंची कवितेतून टोलेबाजी