“मनसेत पक्षप्रवेशाचा धुमधडाका सुरूच, संभाजीनगरमधील अनेक तरूणांनी हाती धरला मनसेचा भगवा झेंडा”

0
496

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

संभाजीनगर : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मनसेनं जोरदार कंबर कसली असून गेल्या काही दिवसांपासून पक्षात जोरदार इनकमिंग सूरू आहे.

मनसे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन तसेच संभाजीनगर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री. सुमित खांबेकर ह्यांच्या मार्गदर्शनाखाली नवनिर्माणाचा संकल्प हाती घेत ‘टीव्ही सेंटर’ येथील तरुणांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा हाती घेतला.

हे ही वाचा : “माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचं निधन, कोपरगाव येथील राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास”

विभाग अध्यक्ष श्री. भगवान काकडे पाटील, उपविभाग अध्यक्ष श्री. आकाश सोटम पाटिल, विभाग सचिव श्री. हरीश लिंगायत, उप विभागध्यक्ष श्री. मधुकर काळे पाटील, केबल संघटनेचे श्री. ललित मोरे ह्यांच्या नवीन नेतृत्वाखाली शेकडो तरुणांनी मनसेत प्रवेश घेतला.

दरम्यान, हा प्रवेश सोहळा मनसे संभाजीनगर जिल्हा कार्यालय येथे झाला. यावेळी राज्य उपाध्यक्ष श्री. सतनामसिंग गुलाटी, जिल्हा सचिव श्री. प्रशांत जोशी, उपशहर अध्यक्ष श्री. गणेश साळुंके पाटील, श्री. अविनाश फोफळे, श्री. अभय देशपांडे, श्री. रामकृष्ण मोरे, श्री. युवराज गवळी, श्री. प्रतीक गायकवाड पाटील आदी पदाधिकाऱ्यांनी पक्ष प्रवेश सोहळ्यास पुढाकार घेतला.

महत्वाच्या घडामोडी –

सरकार झुकती है, बस झुकानेवाला चाहिए; चंद्रकांत पाटलांचा मविआ सरकारला टोला

“प्रवीण दरेकरांना दिलासा नाहीच, ‘या’ प्रकरणातील दाखल याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली”

“मनसे दणका; राज ठाकरेंचा आदेश आणि IPL च्या बसेसवर खळखट्याक”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here