आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नवी दिल्ली : एक मोठी बातमी समोर येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा 5 जूनचा अयोध्या दौरा स्थगित झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
तब्येतीच्या कारणामुळे राज यांचा हा दौरा पुढे ढकलला गेला आहे. यावरून आता भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे ही वाचा : “शिवसेनेची ताकद वाढली; राष्ट्रवादीच्या तब्बल ‘इतक्या’ कार्यकर्त्यांनी हाती बांधलं शिवबंधन”
राम हा हिंदुस्थानातील देव आहे. रामाच्या चरणी कोणालाही जायला सूट असते. रामजन्मभूमी मंदिरात दर्शनासाठी कोणीही जाऊ शकतं. सगळ्यांना त्याचा अधिकार आणि सूट आहे. हे दोन विषय वेगळे आहेत, असं सोमय्या म्हणाले. ते नवी दिल्लीत माध्यमांशी बोलत होते.
एका बाजुला मनसे आणि दुसऱ्या बाजुला माफिया सेना यांचं भांडण सुरू आहे. माफिया सेनेने भगवा उतरवून हिरवा झेंडा हाती घेतलाय. आता रोज उठून माफिया सेनेचे लोक एकमेकांना जय रामजी की, नमस्कार, जय महाराष्ट्र म्हणत नाही, तर आदाब म्हणतात, असा टोला सोमय्यांनी शिवसेनेला लगावला.
महत्वाच्या घडामोडी –
अखेर 16 दिवसांनी अवतरले संदीप देशपांडे; राज ठाकरेंची भेट
“किरीट सोमय्याला कोट्यावधी रुपयांच्या देणग्या कोण देत आहेत?, ब्लॅकमेलर जेल जायेंगे”
“मोठी बातमी! ‘या’ कारणामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दाैरा स्थगित?”