“पुण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरें केलं मनसैनिकाच्या बाळाचं नामाकरण”

0
333

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : पुणे दौऱ्यावर असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या एका चाहत्याने त्यांच्याकडे वेगळच मागणी केली. परभणी जिल्ह्यातील निशांत आणि विशाखा कमळू या जोडप्याने राज ठाकरेंना आपल्या चार वर्षांच्या चिमुरड्याचे नाव ठेवण्याची मागणी केली.

राज ठाकरे यांनी दांपत्याच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत त्या मुलाचे नाव ‘यश’ ठेवलं आहे.

हे ही वाचा : “…पण खरी बातमी तर अशी आहे की, उदय सामंत मनसेत प्रवेश करण्याची शक्यता; मनसेचा पलटवार

राज ठाकरे बैठक घेत असलेल्या केसरी वाड्यात हे दांपत्य पोहचले. केसरीवाडा येथे झालेल्या बैठकीनंतर या जोडप्याने राज ठाकरेंना भेटून आपल्या मुलाचे नाव ठेवण्याची विनंती केली. राज ठाकरे यांनी मुलाचं नाव ठेवलं.

दरम्यान, निशांत हा गेल्या 14 वर्षांपासून राज ठाकरेंचा प्रचंड चाहता आहे आणि मनसेचा पदाधिकारीही आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“…तर झोपा आणि बलात्काराचा आनंद घ्या; काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त विधान”

मनसेत पक्षप्रवेशाचं वादळ; घाटकोपर येथील असंख्य तरूणांनी हाती धरला मनसेचा झेंडा

“महाविकास आघाडी घाबरली, नवी मुंबईत महापाैर भाजपचाच होणार”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here