आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोट निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली असून पालघरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आपलं विजयी खातं उघडलं आहे. या निवडणुकीत मनसेनं 2 उमेदवार रिंगणात उतरवले होते. त्यातील तृप्ती योगेश पाटील या पंचायत समिती पालघर मान गटातून विजयी झाल्या आहेत.
अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीमध्ये मान पंचायत समिती गणामध्ये शिवसेना, भाजपा, बविआ, काँग्रेस आणि मनसे अशा सर्वच प्रमुख पक्षांचे उमेदवार रिंगणात होते.
दरम्यान, मात्र मुख्य लढत ही मनसेच्या तृप्ती पाटील आणि अपक्ष मीनाक्षी सांबरे यांच्यात झाली. यात तृप्ती पाटील यांना 2327 मतं मिळाली. तर मीनाक्षी सांबरे यांना 1269 मते मिळाली. अशा प्रकारे तृप्ती पाटील या 1 हजार 58 मतांनी विजयी झाल्या.
महत्वाच्या घडामोडी –
महाविकास आघाडी एकत्र न राहिल्यास भाजपला रोखणं कठीण- अमोल मिटकरी
“धुळे जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीला धक्का, भाजपच्या धरती देवरे विजयी”
“पालघर ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला; विनया पाटील यांचा दणदणीत विजय”
“भाजपसोबत ठरलेलं लग्न, साखरपुड्यासकट मोडून हळदीच्या अंगाने शिवसेना पळून गेली”