Home महाराष्ट्र “मनसे आमदाराकडून ‘या’ कारणासाठी शिवसेनेच्या माजी नगरसेवकाला पाठिंबा”

“मनसे आमदाराकडून ‘या’ कारणासाठी शिवसेनेच्या माजी नगरसेवकाला पाठिंबा”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

ठाणे : कल्याणजवळ असलेल्या मोहने परिसरात मंदिराच्या बांधकामावर कारवाई केल्याच्या संतापातून शिवसेनेच्या माजी नगरसेवकाने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांना शिवीगाळ करत मारहाण केली होती. याप्रकरणी आता मनसेनं शिवसेनेच्या माजी आमदाराला पाठिंबा दिला आहे.

हे ही वाचा : “निवडणुकांमध्ये मोठी किंमत चुकवावी लागण्याच्या भितीने कायदे मागे घेण्याचा निर्णय”

मनसे आमदार राजू पाटील यांनी सहाय्यक आयुक्तांना मारहाण करणाऱ्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकाला पाठिंबा दिला आहे. या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी मनसे आमदार राजू पाटील कारवाई करण्यात आलेल्या मंदिरात पोहचले. गावकऱ्यांशी त्यांनी या विषयावर चर्चा केली.

हिंदू ह्दयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती दिनानिमित् गावातील मंदिरावर कारवाई करण्यात आली. इतर ठिकाणी बिनदिक्कत अनधिकृत बांधकामे सुरु आहे. ते अधिकारी आणि सत्ताधाऱ्यांना दिसत नाही. ज्या अधिकाऱ्याने ही कारवाई केली आहे. त्या अधिकाऱ्याने संपूर्ण गावाची आणि समाजाची माफी मागावी. नंतर आम्ही त्यांना कुठे बेकायदा बांधकाम सुरु आहे हे दाखवू, असा इशारा राजू पाटील यांनी यावेळी दिला.

हत्वाच्या घडामोडी –

“मनसेत सुसाट पक्षप्रवेश; सरपंचासह यवतमाळमधील हजारो कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश”

“पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपचेच वर्चस्व; पाचही सभापती बिनविरोध”

“शेतकऱ्यांसमोर मोदी झुकले, तीनही कृषी कायदे मागे घेण्याची केली घोषणा”