Home महाराष्ट्र मनसेच्या अविनाश जाधवांचा जामीन अर्ज फेटाळला

मनसेच्या अविनाश जाधवांचा जामीन अर्ज फेटाळला

ठाणे : मनसेचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना तब्बल दोन वर्षासाठी तडीपार होण्यासाठी नोटीस बजावण्यात आली होती. अविनाश जाधव यांना मुंबई, ठाणे, ठाणे ग्रामीण, नवी मुंबई आणि रायगड या पाच जिल्ह्यांमधून हद्दपार करण्याची नोटीस बजावण्यात आली होती.

ठाणे महापालिकेच्या कोविड रुग्णालयात नर्स म्हणून काम करणाऱ्या मुलींना काढल्याप्रकरणी मनसेकडून ठाणे महापालिकेसमोर आंदोलन सुरु होतं. हे आंदोलन करत असताना पोलिसांनी अविनाश जाधव यांना ताब्यात घेतलं होतं.

न्यायालयाने अविनाश जाधव यांना 3 ऑगस्टपर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यामुळे आज न्यायालय कोणता निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. मात्र ठाण्यातील अधीनस्थ न्यायालयाने अविनाश जाधव यांचा जामीन फेटाळला आहे.

दरम्यान, लोकांसाठी आंदोलन करताना तडीपारीची नोटीस हे महाराष्ट्र सरकारचं बक्षीस आहे, कोकणासाठी मोफत बस सोडणार म्हणून हे बक्षीस आहे. लोकांच्या, पोलिसांच्या समस्या प्रखरतेने मांडले त्याचं हे बक्षीस आहे, असं अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

…तर मुंबई पोलिसांची सिक्युरिटी कव्हर सोडून द्या; शिवसेनेचं अमृता फडणवीसांना प्रत्युत्तर

राजेश टोपेंच्या कर्तव्यनिष्ठेपुढे मला आधी लगीन कोंढाण्याचं म्हणणाऱ्या तानाजीची आठवण येते- रोहित पवार

… तर तुला लोक रस्त्यावरती तुडवतील; निलेश राणेंची संजय राऊतांवर आक्षेपार्ह टीका

दूध उत्पादकांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही- जयंत पाटील