Home महाराष्ट्र ‘करोना’ संशयितांची नाव उघड केल्याप्रकरणी मनसेच्या नेत्यावर गुन्हा दाखल

‘करोना’ संशयितांची नाव उघड केल्याप्रकरणी मनसेच्या नेत्यावर गुन्हा दाखल

अहमदनगर : करोनाग्रस्त रुग्णांची नाव उघड करु नयेत असे प्रशासनाचे आदेश असताना मनसेचे नेते संजीव पाखरे यांनी रुग्णांची नाव उघड केल्याचा प्रकार समोर आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी संजय पाखरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये विलगिकरण कक्षात उपचार घेत असलेले तीन रुग्ण तिथून कोणालाही न सांगता निघून गेले होते. या रुग्णांचा शोध घेण्यासाठी त्यांच्या नावासह सरकारी कामासाठी एक पत्र तयार करण्यात आलं होतं. हे तिघेही पुन्हा रुग्णालयात दाखल झाले. मात्र, तोवर त्यांच्या नावाचं पत्र व्हायरलं झालं होतं.

रुग्णालयाच्या एका कर्मचाऱ्याने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन नगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी याबाबत पोलिसांना चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार, सायबर सेलने केलेल्या तपासात पुण्यातील मनसेचे उपाध्यक्ष संजीव पाखरे यांनी ही नावं व्हायरल केल्याचं उघड झालं आहे. त्यानुसार, पाखरे यांच्यावर आपत्कालीन व्यवस्थापन कायद्यान्वये बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

पंकजा मुंडेंनी सुरू केलेल्या ऑनलाइन बदली धोरणाला राष्ट्रवादीचा खो

संसर्ग कमी करण्यासाठी ठाकरे सरकारने घेतले ‘हे’ महत्वाचे निर्णय

भीमा कोरेगावची दंगल सुनियोदित होती, शरद पवार आयोगाकडे साक्ष देतील- नवाब मलिक

‘ओम भट स्वाहा’ करूयात या करोना व्हायरसचा; महेश कोठारेंनी केला तात्याविंचूचा व्हिडीओ शेअर