आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मराठीसाठी लढणाऱ्या मनसेमुळे विश्व करंडक टी-20 चे समालोचन मराठीत ऐकता येणार आहे. आयपीएलच्या सामन्यांचे मराठी समालोचन सुरू झाल्यानंतर विश्व करंडक टी-20 चे समालोचन मराठीत करा, अशी मागणी मनसेने केली होती. आधी, हॉटस्टारने हे शक्य नाही म्हटले. पण, मनसेने याबाबतचा पाठपुरावा करणे सोडले नाही. अखेर, विश्व करंडक टी-20 च्या सामन्यांचे मराठी समालोचन प्रसारित करण्याचे हॉटस्टारने मान्य केले आहे.
हे ही वाचा :“अबकी बार, महंगाई पे वार’; वाढत्या महागाईविरोधात बुधवारी राष्ट्रवादीचं राज्यभर आंदोलन”
आयपीलच्या सामन्यांचे समालोचन इतर प्रादेशिक भाषांसोबत मराठीतही करा, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि कामगार सेनेचे चिटणीस केतन नाईक यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर नुकत्याच झालेल्या आयपीएल सामन्यांचे मराठी समालोचन प्रसारित करण्यात आले आहेत.
दरम्यान, विषय नुसता मराठी समालोचनाचा नाही; अर्थकारणाचाही आहे. मराठी समालोचनातून मराठी भाषेतील जाणकारांना रोजगार मिळणार असेल तर तो आम्हाला हवा आहे. हेच राज ठाकरे यांना अपेक्षित आहे, असं केतन नाईक म्हणाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
भाजपाने दाखवला पंकजा मुंडेंवर विश्वास; दिली ‘ही’ मोठी जबाबदरी
कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत युती करणार नाही; राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण
हिंदुत्व सोडलेल्या शिवसेनेकडे भाजप ढुंकूनही पहाणार नाही; राजकीय भूकंपावर भाजपाचा पलटवार