Home महाराष्ट्र चांगल्या माणसांची मनसेला किंमत नाही; जिल्हाध्यक्षांना पदावरून हटवल्यानंतर समर्थक आक्रमक

चांगल्या माणसांची मनसेला किंमत नाही; जिल्हाध्यक्षांना पदावरून हटवल्यानंतर समर्थक आक्रमक

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे 2 दिवसांपूर्वी औरंगाबाद दौऱ्यावर होते. या दौऱ्यामध्ये राज ठाकरेंनी महत्वाचा निर्णय घेतला. मनसेचे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांना तडकाफडकी पदावरून काढण्यात आलं आहे. राज ठाकरे यांनी या बाबत निर्णय घेतला. यानंतर दाशरथे समर्थकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे.

हे ही वाचा : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वंचित बहुजन आघाडी आक्रमक; विधानभवनावर काढणार मोर्चा

समाज माध्यमांवर दाशरथे समर्थक राज ठाकरेंनी घेतलेल्या निर्णयाला मोठ्या प्रमाणावर विरोध करतांना दिसून येत आहे. यामध्ये चांगल्या कर्तुत्ववान माणसाची किंमत नाही तसेच नुकतेच पक्षांतर केलेल्या काहींनी या पक्षात चांगल्या लोकांना किंमत नसल्यामुळे आम्ही हा पक्ष सोडला., असं समर्थंकाडून म्हटलं जात आहे.

दरम्यान, कुठलीही पूर्वकल्पना नसतांना दाशरथे यांची जिल्हाध्यक्ष पदावरून हाकलपट्टी करण्यात आली आहे. मात्र याबाबतचे कारण अजून पर्यंत स्पष्ट होऊ शकलेले नाही.

महत्वाच्या घडामोडी –

ओबीसी आरक्षणप्रश्नी असलेले सरकारचं अहंकार नडला; पंकजा मुंडेंचा घणाघात

मनसेचा राजीनामा दिल्यानंतर रूपाली पाटील यांनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

“ओबीसी आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली महत्त्वपूर्ण बैठक, घेतला ‘हा’ मोठा निर्णय”