आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरे व शिवसेना खासदार संजय राऊत यांची आज समोरासमोर भेट झाली. यानंतर या दोन्ही नेत्यांनी एकमेकांची गळाभेट घेतली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
पुण्यात एका लग्न समारंभात संजय राऊत आणि वसंत मोरे समोरासमोर आले. त्यानंतर दोघांनीही हसत हसत गळाभेटही घेतली. यानंतर दोघांच्यात राजकीय चर्चाही झाले. त्यामुळे ही चर्चा शिवसेना प्रवेशावर झाली का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
हे ही वाचा : बाॅलिवूडचा सूर हरपला, सुप्रसिद्ध गायक के.के. याचं निधन; वयाच्या 54 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
दरम्यान, मशिदीवरील भोंग्यांसमोर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा लावण्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या निर्णयानंतर वसंत मोरेंनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांना पुणे मनसे शहाराध्यक्ष पदावरून तडकाफडकी हटविण्यात आलं. त्यानंतर आता वसंत मोरेंनी पुन्हा एकदा उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर मोरे यांना अनेक पक्षांकडून ऑफर येत असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोरेंना थेट फोन करून शिवसेना प्रवेशाची ऑफर दिली होती. त्यानंतर आता संजय राऊतांच्या गळाभेटीनंतर वसंत मोरे शिवसेनेत प्रवेश करणार का?, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
महत्वाच्या घडामोडी –
भगवी शाल घेतली म्हणजे कोणीही बाळासाहेब होऊ शकत नाही; गुलाबराव पाटलांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल