Home महाराष्ट्र आमदारांना मोफत घरं देण्याच्या निर्णयावरुन मनसेची मुख्यमंत्र्यांवर टीका

आमदारांना मोफत घरं देण्याच्या निर्णयावरुन मनसेची मुख्यमंत्र्यांवर टीका

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्यातील 300 आमदारांना मुंबईत मोफत घरं देणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी विधानसभेत केलेल्या भाषणामध्ये केली. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. या निर्णयावरून आता राज्यातून संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. मनसेने देखील या निर्णयाचा समाचार घेताना थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरच निशाणा साधला आहे.

“मुळात हे कशासाठी हवंय? आमदार निवास उपलब्ध आहे. निवडून येणाऱ्या आमदारांची मुंबईत येतात तेव्हा राहण्याची सोय होते. मग ही मोफत घरं कशासाठी? असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे.

हे ही वाचा : जळगावमध्ये भाजप आणि शिवसेनेत खडाजंगी 

राज्य सरकारच्या तिजोरीत पैशाचा खडखडाट आहे. शेतकऱ्यांना त्यांचे पैसे दिले जात नाहीत. वीज कापणी जोरात सुरू आहे. एसटी कर्मचारी पगार होत नाहीत म्हणून संपावर आहेत. बेस्ट कर्मचाऱ्यांचीही अशीच अवस्था आहे. पैसे नाहीत म्हणू नोकरभरती होत नाही. मग हा अवाढव्य खर्च नेमका कशासाठी आणि कुणाच्या सांगण्यावरून?” असंह संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

करुणा शर्मा -धनंजय मुंडेंची प्रेमकहाणी मराठीत येणार- करुणा शर्मा

‘…अन्यथा आम्ही ‘मातोश्री’वर मोर्चा काढू’ ; ब्राह्मण समाजाचा इशारा

जयश्रीताईंना भाजपकडून लढण्यास सांगा; चंद्रकांत पाटलांचं काँग्रेस पक्षाला जाहीर आवाहन