‘जब हम दो साथ खडे, तो…; रुपाली पाटलांच्या राजीनाम्यानंतर मनसे नगरसेवकाचं ट्विट होतंय व्हायरल

0
1783

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रदेश उपाध्यक्ष रुपाली पाटील- ठोंबरे यांनी आपल्या सर्वपदासह पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर महानगरपालिकेतील मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांचं ट्विट व्हायरल होत आहे .

वसंत मोरे यांनी ट्विटरवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सोबत स्वतः व मनसेचे नगरसेवक साईनाथ बाबर यांच्या सोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोवर त्यांनी ‘जब हम दो साथ खडे तो सबसे बडे, अजून तात्या आणि साई भक्कम उभे आहेत’ असं वसंत मोरे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या ट्विटची सोशल मीडियावर चर्चा होतेय.

हे ही वाचा : “राज्यातील भाजप नेत्यांनी वारंवार महाराष्ट्राची बदनामी करण्याचा प्रयत्न केला, पण…”

दरम्यान, सद्यस्थितीला पुणे महानगरपालिकेत वसंत मोरे आणि साईनाथ बाबर हे दोघेच मनसेचे नगरसेवक आहेत. रुपाली पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांनी केलेलं हे ट्विट व्हायरल होत आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“जोपर्यंत महाराष्ट्रात पप्पू आणि पेंग्विन शिवसेनेचं नेतृत्व करतील, तोपर्यंत भाजपला कोणीही रोखू शकत नाही”

पंतप्रधान मोदींवर टीका करताना अमोल मिटकरींची जीभ घसरली; म्हणाले…

सचिन वाझे शिवसेनेचा माणूस तर अंबानी…; राज ठाकरेंच्या वक्तव्यामुळे मोठी खळबळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here