आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मराठी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मनसेप्रमुख हे शिवाजी पार्कवरील सभेतून मनसैनिकांशी संवाद साधणार आहेत. पण त्यापुर्वी मनसेकडून शिवसेना भवन आणि शिवाजी पार्क परिसरात बॅनरबाजी करण्यात आली आहे.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब यांच्यानंतर कट्टर हिंदु रक्षक राज ठाकरे अशा आशयाचा बॅनर सेनाभवनासमोर लावण्यात आला आहे. विशेष म्हणजे लावण्यात आलेल्या गुडीपाडव्याच्या बॅनरमधून मनसेकडून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. तब्बल 20 फुटाचा बॅनर शिवसेना भवनासमोर मनसेकडून लावण्यात आला आहे.
हे ही वाचा : “रसेल द मसल शो; आंद्रे रसेलच्या विस्फोटक खेळीच्या जोरावर KKR चा पंजाबवर 6 विकेट्सने दणदणीत विजय”
दरम्यान, आज मेळाव्यात ते अयोध्या दौऱ्याबाबत घोषणा केली जाण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तविली जात आहे. कांचन गिरीजी आणि जगतगुरू सूर्याचार्य यांनी मुंबईत येऊन राज ठाकरे यांना अयोध्येत येण्याचे निमंत्रण दिले होते. त्यानंतर राज ठाकरे आयोध्येला जाणार होते. परंतु कोरोनाच्या कडक निर्बंधामुळे त्यांचा दौरा रद्द करण्यात आला.
महत्वाच्या घडामोडी –
आता पुढील नंबर अनिब परब यांचा असून लवकरच त्यांनी बॅग भरावी; किरीट सोमय्यांचा सल्ला
“भाजपचा राष्ट्रवादीला दणका; ‘हा’ मोठा नेता पुन्हा स्वगृही परतला”
नवाज शरीफ, जीव वाचविण्यासाठी मोदींना लपून भेटले; इम्रान खान यांचा धक्कादायक आरोप