मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी विविध पक्षांमध्ये मेगाभरती सुरु झाली आहे. राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही मैदानात उतरली आहे.
राज ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या कृष्णकुंजबाहेर गर्दी झाली आहे. पक्षप्रवेशासाठी कृष्णकुंजबाहेर अनेकांनी गर्दी केली. बोरिवली विधानसभा क्षेत्रातील वकिलांचा मनसेत पक्षप्रवेश होत आहे.
मनसेने ज्या शाळेच्या फी वाढीविरोधात आंदोलन केलं, त्या रायन इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे पालकही मनसेत प्रवेश करत आहेत. इतकंच नव्हे तर मुंबईच्या डबेवाल्यांचे काही प्रतिनिधी मनसेत प्रवेश करणार आहेत.
दरम्यान, राज्यात होणाऱ्या ग्रामपंचायच निवडणुकीतत सर्व ठिकाणी उमेदवार उभे करा, ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढवा, असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या सर्व जिल्हाध्यक्षांना दिले आहेत. त्यामुळे मनसेही या निवडणुकीत ताकदीने उतरणार असल्याने ही निवडणुक चौरंगी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महत्वाच्या घडामोडी-
संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत ईडी कार्यालयात दाखल
‘त्यांना चपलेने मारायचं’; जुना व्हिडिओ पोस्ट करत नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना टोला
सत्ता पणाला लावायची की नाही, हे शिवसेनेनं ठरवावं- चंद्रकांत पाटील
“शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश”