Home पुणे मनसे करणार पुण्यात आंदोलन; ‘या’ कारणासाठी राज ठाकरे उतरणार मैदानात

मनसे करणार पुण्यात आंदोलन; ‘या’ कारणासाठी राज ठाकरे उतरणार मैदानात

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात मोर्चेबांधणी करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता थेट पुण्यातच आंदोलन करणार आहेत. मनसेचे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी या आंदोलनाची माहिती दिली.

तळजाई टेकडीवरील प्रकल्पाला विरोध करण्यासाठी राज ठाकरे यांच्या नेतृत्वात 24 ऑक्टोबर रोजी पुण्यात मोठं आंदोलन होणार असून त्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

तळजाई टेकडीवर प्रकल्प होत असून या टेकडीवर एक प्रकारचं अतिक्रमणच केलं जाणार आहे. त्याला आमचा विरोध आहे. त्यासाठी आम्ही आंदोलन करणार आहोत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात येत्या 24 तारखेला हे आंदोल होणार आहे. सकाळी 7 वाजताच या आंदोलनाला सुरुवात होणार असल्याची माहिती वसंत मोरे यांनी दिली.

महत्वाच्या घडामोडी –

बुधवारी आणखी एक पोलखोल करणार; किरीट सोमय्यांचा पवारांना इशारा

काँग्रेसचा ‘हा’ बडा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर; चर्चांना उधाण

“अजित पवारांनी रडणं बंद करावं, त्यांचे बाहेर राहण्याचे जास्त दिवस शिल्लक नाहीत”

बंद पुकारने ही महाविकास आघाडीची चुकीची भूमिका- रामदास आठवेले