Home महाराष्ट्र मनसे कार्यकर्त्यांचा स्वबळाचा नारा; राज ठाकरे घेणार अंतिम निर्णय

मनसे कार्यकर्त्यांचा स्वबळाचा नारा; राज ठाकरे घेणार अंतिम निर्णय

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : एकला चलो यामधून आम्ही निवडणूका लढवल्या आहेत. मात्र तुर्तास तरी भाजपा सोबत युती करण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. मात्र ‘तुम्हाला लवकरच चांगली बातमी मिळेल’, असं मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले आहेत. त्यावरुन आगामी निवडणुकांमध्ये मनसे आणि भाजपची युती होणार?च अशा चर्चा रंगल्या आहेत. अशातच या निवडणुका मनसेने स्बळावर लढव्याव्यात, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.

हे ही वाचा : “पुण्यात केवळ शनिवारवाडाच नाही तर…”; अमोल कोल्हेंचं ट्विट चर्चेत

आतापर्यंतच्या सर्व निवडणुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं स्वबळावर लढविल्या आहेत. आगामी महापालिका निवडणुकीसाठी मनसे आणि भाजपा यांच्यात युतीबाबतच्या चर्चा सुरू आहे. या निवडणुका मनसेने स्बळावर लढव्याव्यात, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. मात्र, याबाबतचा ठोस निर्णय मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेणार आहेत, अशी माहिती मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिली.

दरम्यान, राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’या नव्या निवासस्थानी मनसे नेत्यांची बैठक झाली. यावेळी आगामी महापालिका निवडणुकीसंदर्भात रणनीती ठरवण्यासाठी या बैठकीत मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे यांच्यासह इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते. या बैठकीनंतर बाळा नांदगावकर यांनी माध्यमांशी संवाद साधला.

महत्वाच्या घडामोडी –

शिवसेनेने घेतलेल्या ‘या’ भूमिकेला काँग्रेसचं समर्थन

रोहित पवारांना मिळणार मंत्रिपद?; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

“…तर भाजपला समर्थ पर्याय देण्याच्या बाता कुणी करू नयेत”