Home महाराष्ट्र आमदार शंकरराव गडाखांकडून उद्धव ठाकरेंच्या संयमी नेतृत्वाचं काैतुक, म्हणाले…

आमदार शंकरराव गडाखांकडून उद्धव ठाकरेंच्या संयमी नेतृत्वाचं काैतुक, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

अहमदनगर : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे 40 आमदार व अपक्ष 10 आमदारांसोबत मिळून शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं. आणि एकनाथ शिंदे यांचं सरकार स्थापन झालं. त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. तर उरलेले 15 आमदार शिवसेनेसोबत आहे. यात अपक्ष आमदार व माजी मंत्री शंकरराव गडाख यांचा देखील समावेश आहे.

शंकरराव गडाख यांनी आज अहमदनगरमध्ये भाष्य केलं. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संयमी नेतृत्वाचं काैतुक केलं.

हे ही वाचा : “राज ठाकरे इज बॅक; शस्त्रक्रियेनंतर आता राज ठाकरे मैदानात, यंदा महापालिकेवर भगवा फडकणारच”

राज्यात नव्हे तर देशात उद्धव ठाकरेंसारखा दुसरा नेता असता आणि शिवसेनेसारखी जहाल संघटना त्यांच्या हाती असती, तर बोट दाखवेपर्यंत रक्ताचे वाट पाहिले असते, असं म्हणत गडाखांनी उद्धव ठाकरेंच्या संयमी नेतृत्वाचं विशेष काैतुक केलं.

उद्धव साहेब हे अजिबात राजकीय व्यक्ती नाहीत. शिवसेना ही अतिशय जहाल संघटना आहे. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसैनिकांच्या रक्तात एक वेगळी ताकद आणि रग निर्माण केलीये. असा बंड होत असताना शिवसेनेसारखा पक्ष उद्धव ठाकरेंच्या हाती होती. राज्यात नव्हे तर देशात उद्धव ठाकरेंसारखा दुसरा नेता असता आणि शिवसेनेसारखी जहाल संघटना त्यांच्या हाती असती, तर बोट दाखवेपर्यंत रक्ताचे वाट पाहिले असते. पण या माणसाने स्वत: कमीपणा घेऊन हे सगळं थांबवलं. त्यांनी संयमाने भूमिका घेतल्यानं ते आपण सगळ्यांनीच पाहिलं असल्याचं गडाख म्हणाले.

महत्त्वाच्या  घडामोडी –

शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यानंतर बंडखोर आमदार संतोष बांगर यांंची प्रतिक्रिया, म्हणाले…

बंडखोर आमदारांविरोधात कठोर पावले उचलण्यास सूरूवात; ‘या’ आमदारांवर शिवसेनेची मोठी कारवाई

शिवसेनेला पुन्हा हादरा! ‘हा’ नेता एकनाथ शिंदे गटात सामील