पारनेर : मानवसेवा हीच माधवसेवा आहे, या भावनेतून करोना संकटकाळात आमदार नीलेश लंके करत असलेले काम केवळ तालुका, जिल्हा, राज्यासाठी नव्हे तर देशासाठी आदर्शवत, दिशादर्शक असल्याचं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.
देशात अनेक आमदार आहेत मात्र आमदार लंके यांच्यासारख्या सर्वसामान्यांच्या सेवेसाठी 24 तास वाहून घेणारा लोकप्रतिधी विरळाच. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरापासून आमदार लंके यांचे काम अव्याहतपणे सुरू आहे. भाळवणी येथील उपचार केंद्रात दाखल झालेला रुग्ण तेथील आनंदी वातावरणाचा अनुभव घेतल्यावर आपण आजारी आहोत, आपणास कोरोना संसर्गाची बाधा झाली असल्याचे विसरून जातो, असं अण्णा हजारे म्हणाले.
नीलेश लंके ज्या वेळी आमदार नव्हते, त्या वेळीही जनसामान्यांसाठी ते अहोरात्र झटत असत हे आपण अनुभवले आहे. आमदार लंके कोणत्याही लाभाची अपेक्षा न करता करीत असलेल्या निष्काम सेवेमुळे त्यांच्या विषयीचा आदर वाढत आहे, असे हजारे म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
“आम्ही अजून हिंदुत्व सोडलं नाही, असं तरी आता कोडगेपणाने सांगू नका”
“ठाकरे सरकारने दारूचा प्यालाच उचललाय, दारू-बार याच मुद्द्यावर सरकार झटपट निर्णय घेते”
आधी मराठा आता OBC समाजाची माती केलीत; चित्रा वाघ ठाकरे सरकारवर कडाडल्या
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून काहीच चांगलं घडताना दिसत नाही- निलेश राणे