Home क्रीडा मिशेल स्वीपसनची शानदार गोलंदाजी: ऑस्ट्रेलियाची भारतावर 12 धावांनी मात; भारताने मालिका जिंकली

मिशेल स्वीपसनची शानदार गोलंदाजी: ऑस्ट्रेलियाची भारतावर 12 धावांनी मात; भारताने मालिका जिंकली

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 12 धावांनी पराभव केला. तरी भारताने ही मालिका 2-1 ने आपल्या खिशात टाकली.

भारताने या सामन्यात टाॅस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 गडी गमावत 186 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मैथ्यू वेडने 53 चेंडूत 80 धावा तर ग्लेन मैक्सवेलने 36 चेंडूत 54 धावा केल्या. भारताकडून वाॅशिंग्टन सुंदरने 2 तर शार्दूल ठाकूर व टी.नटराजनने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

धावांचा पाठलाग करताना भारताचा संघ 20 षटकात 7 गडी गमावत 174 धावाच करू शकला. भारताकडून कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक 61 चेंडूत 85 धावांची खेळी केली. तर शिखर धवनने 21 चेंडूत 28 धावा, शार्दूल ठाकूरने 7 चेंडूत नाबाद 17 धावा केल्या. तर ऑस्ट्रेलियाकडून मिशेल स्वीपसनने 3, तर ग्लेन मैक्सवेल, अॅडम झैम्पा, अॅण्ड्रयू टाय, सीन अॅबाॅटने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

महत्वाच्या घडामोडी-

प्रत्येक जातीची जणगणना व्हावी- रामदास आठवले

“शिवसेना ही शरद पवारांच्या चरणी लीन झाली आहे; प्रवीण दरेकरांचा टोला

मैथ्यू वेड-ग्लेन मैक्सवेलची आक्रमक फलंदाजी; ऑस्ट्रेलियाचे भारतासमोर 187 धावांचे लक्ष्य

शिवसेनेला शेतीतलं काय कळतं; फक्त मोदींच्या विरोधासाठी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा- निलेश राणे