नवी दिल्ली : मिस्बाह उल-हक हा सध्या पाकिस्तान क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे. पाकिस्तानच्या मागील काही सामन्यात झालेल्या नाचक्कीमुळे पाकिस्तानचा माजी खेळाडू रमीज राजा याने मिस्बाह-उल-हकला गरीबाचा एम.एस.धोनी म्हटलं आहे. क्रिकेटबाज या युट्युब चॅनेलला दिलेल्या एका मुलाखतीत रमीज राजा बोलत होता.
मागील वर्षभरापासून पाकिस्तानचा संघ खराब कामगिरी करताना दिसत आहे. मागील न्यूझीलंड दौऱ्यात देखील टी-20 आणि कसोटी मालिकेत पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला होता. यासाठी रमीज राजाने पाकिस्तान क्रिकेटचे मुख्य प्रशिक्षक मिस्बाह-उल-हक याला जबाबदार धरलं आहे. धोनी आणि मिस्बाह यांचा स्वभाव मिळता जुळता आहे. त्याला गरीबांचा धोनी म्हणणं चुकीचं ठरणार नाही, असं रमीज राजा म्हणाला.
दरम्यान, आधुनिक क्रिकेटच्या हिशेबाने त्याला त्याच्या स्वभावात बदल करणं गरजेचं आहे. मिस्बाहच्या मार्गदर्शनाखाली संघ खूप बचावात्मक पद्धतीने खेळत आहे. त्यामुळे संघाला सातत्याने पराभवाचा सामना करावा लागत आहे. संघाने आक्रमक खेळ करून पराभवातून बाहेर पडायला हवं, असंही रमीज राजा यानं म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“…तर ठाकरे सरकार मृतवत म्हणावे का?; लवकरच तेरावं घालावं लागेल”
दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार- शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी खूप अभ्यास केलाय; आम्हा डॉक्टरांपेक्षाही त्यांना कोरोनाचं जास्त ज्ञान”
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील ‘भिडे मास्तर’ ला कोरोनाची लागण