आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला युतीची ऑफर दिल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकाणात खळबळ उडाली आहे. या प्रस्तावावरून भाजपने शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला आहे. आता अशातच शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणावर भाष्य केलं आहे.
हे ही वाचा : पाकव्याप्त काश्मीर भारताला कधी जोडताय?- संजय राऊत
एमआयएम ही भाजपची बी टीम आहे. त्यामुळे त्यांच्याशी आघाडी करण्याचा प्रश्नच येत नाही, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. शिवसेना खासदार आणि जिल्हाप्रमुखांचं शिवसंपर्क अभियान सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना खासदार आणि जिल्हा प्रमुखांशी आज संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
शिवसेना ही प्रखर राष्ट्रवादी पक्ष आहे. शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष आहे आणि विचार आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी जो विचार दिला आहे. तो विचार आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. आपल्याबाबत संभ्रम निर्माण केला जात आहे. त्याला बळी पडू नका. राज्यातील जनतेत जो संभ्रम निर्माण होत आहे, तो दूर करा, असं उद्धव ठाकरे म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
MIM ची तुम्हाला प्रस्ताव देण्याची हिंमतच कशी होते?; मनसेचा शिवसेनेला सवाल
‘…मग मी हिंदुत्त्वाच्या गप्पा मारतो’; MIMच्या ऑफरवरुन शिवसेनेची फडणवीसांवर टीका
शिवसेनेचं हिंदुत्व ढोंगीपणाचं, त्यामुळे…; भाजपचा हल्लाबोल