मिलींद नार्वेकर यांचा बंगलो तोडला, आता पुढचा नंबर अनिल परबांचा- किरीट सोमय्या

0
255

रत्नागिरी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे सहकारी आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी परवानगी न घेताच दापोलीत बंगला बांधल्याची तक्रार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली होती. त्यानंतर आज या बंगल्यावर बुलडोझरचा पंजा मारण्यात आला आहे.

मिलिंद नार्वेकर यांचा मुरुड दापोलीच्या समुद्र किनारी अलिशान बंगला होता. हा बंगला पाडण्याचे काम आज सकाळपासूनच सुरू करण्यता आले. जेसीबी मशीन लावून हा बंगला तोडण्यात आला आहे. किरीट सोमय्या यांनी या तोडक कारवाईचा व्हिडीओ ट्विट करून माहिती दिली आहे.

करून दाखविलं, मिलींद नार्वेकर यांचा बंगलो तोडला. मुरुड दापोलीच्या समुद्र किनाऱ्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नर्वेकर यांचा बेकायदा बंगलो पाडण्याचे काम आत्ता सुरू झाले पुढचा नंबर मंत्री अनिल परब रिसॉर्टचा उद्या मी दापोली ला जावून तोडकामाची पाहणी करणार असल्याचं किरीट सोमय्या म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

…अन् भर रस्त्यात तरूणीला काही समजायच्या आतच तरूणानं घेतली किस; पहा व्हिडिओ

एकनाथ शिंदेच नाही तर महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्री नाराज; चंद्रकांत पाटलांचा दावा

“रावसाहेब दानवेंची बुद्धी भ्रष्ट, मोदींना बैल म्हणणं हा पंतप्रधान पदाचा अपमान”

नवनीत राणा यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा ठोकणार- यशोमती ठाकूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here