मरकजचा कार्यक्रम टाळता आला असता, महाराष्ट्रात असं घडू देऊ नका- शरद पवार

0
182

मुंबई : दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मरकजच्या कार्यक्रमावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मत व्यक्त केलं आहे. शरद पवार यांनी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

दिल्लीतील निझामुद्दीन येथे आयोजित करण्यात आलेल्या मरकजच्या कार्यक्रमाचा देशभरात परिणाम झाला आहे. मरकजचा हा कार्यक्रम टाळता आला असता. महाराष्ट्रात असं घडू देऊ नये, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

दिल्लीत मर्कजच्या आयोजन करण्यात आलं होतं. त्या ठिकाणी हजारो लोक जमले होते. राज्यातलेही अनेकजण त्या ठिकाणी गेले होते. कार्यक्रमानंतर त्यातील काही लोक इतरत्र गेले. त्यातील काही लोकांना करोनाचा प्रादुर्भाव होऊन त्यांनी एकत्र प्रवास केल्याचं नाकारता येत नाही. आता करोनाचा आजार वाढत आहे. आजची स्थिती पाहता आपण काही गोष्टी पाळल्या पाहिजेत. असे प्रकार पुन्हा घडता कामा नये याची काळजी घेतली पाहिजे. मरकजचा सोहळा टाळला पाहिजे होता, असंही शरद पवार यावेळी म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

महाराष्ट्रात करोनाबाधितांची संख्या 335 वर; मुंबईत 14 रुग्ण तर बुलढाण्यात 1 रुग्ण

संजय राऊत म्हणजे पवारांच्या घरचे खरूजलेले कुत्रे; भाजपच्या नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

पुढील वर्ष भराचा माझा पगार अन् CM फंडात जमा करा- जितेंद्र आव्हाड

महाराष्ट्र उध्दवजींच्या सुरक्षित हातात आहे याचा अभिमान वाटतो- जितेंद्र आव्हाड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here