“मेहबूब शेख बलात्कार प्रकरणाला वेगळं वळण; पिडीतेची चित्रा वाघ यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल”

0
720

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाअध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर काही दिवसांपूर्वी बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाला आता वेगळंच वळण लागलं आहे.

कारण आता कथित पीडीत महिलेनं चित्रा वाघ यांच्यावरच आरोप केला आहे. चित्रा वाघ आणि भाजप आमदार सुरेश धस यांनी आपल्याला शेख यांच्याविरोधात तक्रार द्यायला भाग पाडले, अशी तक्रार या तरुणीने पोलिसात दाखल केली आहे. यावरून चित्रा वाघ यांनी ट्विट करत पीडितेनं घुमजाव केल्याचा आरोप यावेळी केला.

हे ही  वाचा : देवेंद्र फडणवीस आमच्या संपर्कात, ते आम्हांलाच मत देतील- बच्चू कडू

NCP चा मेहबूब शेखने माझ्यावर बलात्कार केला मला मदत करा असं आमच्याकडे सांगत आलेल्या पिडीतेने घुमजाव करत गुन्हा दाखल करण्यास आम्हीचं भाग पाडलं म्हणत तक्रार केलीये हे आताचं माध्यमातून कळलयं ज्या केसेस मध्ये राजकीय धेंड असतात तिथे असं होणं अगदी स्वाभाविक  सगळ्या चौकशींना मी तयार आहे, असं चित्रा वाघ म्हणाल्या.

महत्त्वाच्या  घडामोडी – 

“मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसली अनोळखी कार, अपघात थोडक्यात वाचला, ठाकरे स्वत: चालवत होते गाडी”

‘शिवसेना उमेदवाराला मत द्या, अन्…; शिवसेनेकडून अपक्ष आमदाराला ऑफर?

अजित पवार, बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांच्यात देवगिरी बंगल्यावर खलबतं: चर्चांना उधाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here