मुंबई : मराठा आरक्षण कायद्याला सुप्रीम कोर्टाने अंतरिम स्थगिती दिली. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशावर चर्चा झाली. या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह अनेक दिग्गज नेते मंडळी उपस्थित होते. यावर अशोक चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
मराठा समाजाने संयम बाळगावा. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश अंतरिम आहे आणि त्यासंदर्भात राज्य सरकार योग्य ती पुढील कार्यवाही करणार आहे. त्यामुळे कोणीही निराश होऊ नये. कोणतंही टोकाचं पाऊल उचलू नये, अशी विनंती अशोक चव्हाण यांनी केली आहे.
दरम्यान, मराठा समाजाने संतापून कायदा हातात घ्यावा आणि त्याचा राजकीय वापर करता यावा तसेच सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाची चुकीची प्रतिमा निर्माण करता यावी, या हेतूने हे कारस्थान केले जाते आहे. समाजाने हे षडयंत्र ओळखण्याची आणि हाणून पाडण्याची गरज असल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
“मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना कोरोनाची लागण”
बाळासाहेबांची विचारधारा विकून शिवसेनेची ‘सोनिया सेना’; कंगणा रणाैतचा उद्धव ठाकरेंना खडेबोल
कंगना रणौतप्रकरणी सत्ताधारी शिवसेनेनं दादागिरी करु नये; रामदास आठवलेंचं आवाहन