मुंबई : राज्यात अपारंपारिक ऊर्जा धोरणाला चालना देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आली आहे. या बैठकीत पवनऊर्जा वगळता इतर अपारंपरिक ऊर्जानिर्मितीला प्राधान्य देण्याचा आणि त्यानुसार साखर कारखान्यांच्या सहवीजनिर्मिती प्रकल्प क्षमतेत सुमारे एक हजार मेगावॉटची भर घालण्याचा निर्णय घेण्यात आला.
कोळशावर आधारीत वीज उत्पादनाऐवजी सौर वा तत्सम अपारंपारिक ऊर्जेला प्राधान्य देण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. तसंच राज्यात सहवीज निर्मितीचे 2000 मेगावाट क्षमतेचे प्रकल्प असून त्यात आणखी एक हजार मेगावॉटची भर घालण्याचं ठरलं आहे.
दरम्यान, राज्यात पारंपरिक कृषीपंप जोडणीचे हजारो अर्ज प्रलंबित असून शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाचे वाटप करून दिलासा देण्यात येणार आहे. यामुळे कृषीपंपाच्या वीज जोडणीचे प्रलंबित अर्ज निकाली काढता येतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
भारतीय कंपनीला डावलून चिनी कंपनीला दिलेलं कॉन्ट्रॅक्ट रद्द करा- जितेंद्र आव्हाड
सुशांत तू खूप लवकर निघून गेलास; शेन वॉटसनही गहिवरला
चीनला जर युद्धाची खुमखुमी असेल तर….; रामदास आठवलेंचा इशारा
महाराष्ट्राला आणि पर्यावरणाला वाचवायला माळकरी आणि वारकरीच पुरेसे आहेत- सयाजी शिंदे