“महापौर मुरलीधर मोहोळ यांनी लागू केले पुण्यात नवे निर्बंध”

0
157

पुणे : पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आतापर्यंत अनेक निर्बंध लावले होते मात्र तरीही पुण्यातील कोरोना संसर्ग आटोक्यात येताना दिसत नसल्याने महापौरांनी नवे आदेश काढले आहेत. ट्विट करून त्यांनी ही माहिती दिली.

अत्यंत महत्त्वाचे नवे आदेश !

पुणे महानगरपालिका क्षेत्रात सर्व प्रकारचे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय व धार्मिक कार्यक्रमास पुढील आदेशापर्यंत संपूर्ण प्रतिबंध राहील.

लग्नसमारंभ कार्यक्रम 50 लोकांच्या उपस्थितीत करण्यास परवानगी राहील.

अंत्यसंस्कार दशक्रिया व त्या निगडित कार्यक्रम 20 लोकांच्या उपस्थितीत करण्यास परवानगी राहील.

पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व कार्यालय (आरोग्य व अत्यावश्यक सेवा वगळून) 50 टक्के मनुष्यबळासह सुरू ठेवता येतील. शक्य असल्यास ‘वर्क फ्रॉम होम’चा पर्याय निवडावा.

दरम्यान, असं ट्विट करत मुरलीधर मोहोळ यांनी नवे आदेश काढले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

मोहम्मद अझरुद्दीनचा ‘सुपरमॅन’ अवतार, अफलातून रनआउट; पाहा व्हिडिओ

“भाजपचे माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांचं कोरोनामुळं निधन”

जोस बटलरच्या आक्रमक अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडचा मोठा विजय; मालिकेत 2-1 ने आघाडी

…तर ठाकरे आणि सोनू निगमची स्टोरी अख्य्या महाराष्ट्राला सांगणार; निलेश राणेंचा इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here