“अखेर ‘मातोश्री’नं घेतली दखल; शिवसेनेच्या ‘या’ नाराज आमदाराचा राष्ट्रवादीतील प्रवेश थांबवला”

0
2514

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : दापोलीचे शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी हे पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र त्यांच्या नाराजीची दखल मातोश्रीनं घेतल्यामुळं दळवींसह त्यांच्या समर्थकांचा राष्ट्रवादीतील प्रवेश तात्पुरता थांबला आहे.

हे ही वाचा : शिवसेनेत राजकीय भूकंप; 58 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा राजीनामा

सुर्यकांत दळवी हे सध्या मुंबईत आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या दापोलीतील काही पदाधिकाऱ्यांनी त्यांना राष्ट्रवादीत येण्याचे निमंत्रण दिलं आहे. मात्र, दळवींचा राष्ट्रवादीतील प्रवेश सध्या तरी थांबला असूनवत्यांना शिवसेनेत पुन्हा सक्रिय करण्यासाठी दळवी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडे चर्चा करत असून त्यात त्यांना यश आल्याची माहिती समोर आली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“शिवेंद्रराजे भोसले यांनी घेतली शरद पवारांची भेट; राजकीय चर्चांना उधाण”

राजकारणात कुणाला घाबरत नाहीत, पण देवेंद्र फडणवीसांना वाटते ‘या’ गोष्टीची भीती

शिवसेनेकडून भाजपला मोठे खिंडार; पालघरमध्ये अनेक पदाधिकाऱ्यांनी हाती घेतला सेनेचा भगवा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here