Home महाराष्ट्र मरकजमधील व्यक्तींनी पुढे येऊन तपासणीसाठी सहकार्य करावं- उद्धव ठाकरे

मरकजमधील व्यक्तींनी पुढे येऊन तपासणीसाठी सहकार्य करावं- उद्धव ठाकरे

मुंबई : दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मरकजच्या कार्यक्रमावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आहे.

महाराष्ट्रात कोणत्याही जाती-धर्माचे सण, उत्सव, मेळावे होणार नाहीत, याची खबरदारी घ्या. प्रसंगी मी स्वत: त्यांच्या आयोजकांशी बोलेन पण महाराष्ट्रात कोणताही धार्मिक कार्यक्रम नको आणि मरकजमधील सहभागी व्यक्तींनी तातडीने पुढे येऊन आपल्या तपासणीसाठी सहकार्य करावं, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी जनतेला केलं आहे.

भाजीबाजारांमध्ये सुद्धा सुसूत्रता आणणं आवश्यक आहे. तिथे शिस्त लावा, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

दरम्यान, आपण नागरिकांच्या सुविधेसाठी 24 तास दुकाने उघडी ठेवली आहेत मात्र काही ठिकाणी लोक त्याचा गैरफायदा घेत असल्याचं दिसत आहे.असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

महाराष्ट्रात करोनाबाधितांची संख्या 335 वर; मुंबईत 14 रुग्ण तर बुलढाण्यात 1 रुग्ण

संजय राऊत म्हणजे पवारांच्या घरचे खरूजलेले कुत्रे; भाजपच्या नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

पुढील वर्ष भराचा माझा पगार अन् CM फंडात जमा करा- जितेंद्र आव्हाड

महाराष्ट्र उध्दवजींच्या सुरक्षित हातात आहे याचा अभिमान वाटतो- जितेंद्र आव्हाड