मार्कस स्टाॅयनिसचे शानदार अर्धशतक; दिल्लीचे राॅयल चॅलेंजर्स बेंगलोरला 197 धावांचे लक्ष्य

0
189

दुबई : आजचा आयपीएलचा सामना दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध राॅयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात खेळला जात आहे. ज्यात दिल्ली कॅपिटल्सने राॅयल चॅलेंजर्स बेंगलोर समोर 197 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

राॅयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने टाॅस जिंकून दिल्ली कॅपिटल्सला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. दिल्ली कॅपिटल्सनं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 गडी गमावत 196 धावा केल्या. दिल्लीकडून पृथ्वी शाॅने 23 चेंडूत 42, शिखर धवनने 28 चेंडूत 32 धावा, तर मार्कस स्टाॅयनिसने 26 चेंडूत 53 धावा केल्या.

तर राॅयल चॅलेंजर्स बेंगलारकडून मोहम्मद सिराजने 2 तर ईशुरू उडाना, मोईन अली यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

महत्वाच्या घडामोडी-

“….यामुळे भाजपा नेत्यांच्या संस्कारावरच प्रश्नचिन्ह”

दानवे किती रस्त्यावर असतात हे माहीत आहे; बाळासाहेब थोरातांचा दानवेंना टोला

नटीसाठी छाती बडवणाऱ्यांना हाथरसचं तिकीट काढून द्या- संजय राऊत

“माझ्याजवळ गिरीश महाजन यांची अनेक गुपिते आहेत, त्यामुळे मला ठार मारण्याच्या धमक्या येत आहेत”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here