पुणे : ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या सामन्यात आपण अत्यंत वाईट हरलो याचं प्रत्येक भारतीयाला दु:ख झालं. मात्र हरलो म्हणून खचून जायचं नाही हे मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने दाखवून दिलं असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अजिंक्य रहाणेचं कौतुक केलं.
महाराष्ट्रात, पिंपरी-चिंचवड शहरात खेळाडू घडावेत आणि त्यांनी महाराष्ट्राच, देशाचं प्रतिनिधित्व करावं, असं अजित पवार म्हणाले. पिंपरी-चिंचवडमध्ये माजी विरोधीपक्ष नेते राजू मिसाळ यांनी आयोजित केलेल्या क्रिकेट सामन्यांच्या आयोजनावेळी अजित पवार बोलत होते.
दरम्यान, अजित पवारांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या क्रीडा क्षेत्रात दिलेल्या योगदानावरही भाष्य केलं. क्रिकेट हा खेळ सर्वांना आपलासा वाटतो. क्रिकेट या खेळाला आगळं-वेगळं महत्व प्राप्त करून देण्याचं काम शरद पवारांनी केलं असल्याचंही अजित पवार म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
“सीमावादावर ‘हे’ शेवटचं हत्यार असून आपण अंतिम पर्वाच्या दिशेने”
दिल्लीतील हिंसा हा शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचा भाजपचा कट- नवाब मलिक
आशिष शेलार हे भाजप व संघाचे गुलाम; अमोल मिटकरींचा टोला
BCCI अध्यक्ष साैरव गांगुलीची प्रकृती पुन्हा बिघडली; रूग्णालयात केलं दाखल