मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आंदोलकांनी छत्रपती शिवाजी टर्मिनसवर ठिय्या आंदोलन सुरू केलं.
आंदोलन सुरू झाल्यानंतर आंदोलकांच्या एका गटाने विधानमुसभेकडे कूच केली असता पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. त्यामुळे पोलिसांनी काही आंदोलकांची धरपकड केल्याने या परिसरात तणाव निर्माण झाला.
पुणे, नाशिक, रायगड आणि मराठवाड्यातून मराठा क्रांती मोर्चा समन्वयक समितीचे कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले होते. आंदोलकांनी आज सकाळपासून मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन सुरू केलं. मात्र, दुपारनंतर आंदोलक अधिक आक्रमक झाले. या आंदोलकांनी छत्रपती शिवाजी टर्मिनसवर जोरदार ठिय्या आंदोलन सुरू केलं.
दरम्यान, या आंदोलकांनी सीएसटी परिसरात रस्त्यावर बसूनच घोषणाबाजी सुरू केली. ‘या सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय’, ‘ठाकरे सरकार हाय हाय’, अशा घोषणा देत आंदोलकांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला आहे. आंदोलकांनी ऐन रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केल्याने या परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. तसेच या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला.
महत्वाच्या घडामोडी-
महाविकास आघाडी सरकार धनगरांचा तीरस्कार करतंय- गोपीचंद पडळकर
उचलली जीभ आणि लावली टाळ्याला हा भाजपचा एककलमी कार्यक्रम- अशोक चव्हाण
“भारताचे पहिले हिंदकेसरी काळाच्या पडद्याआड, कोल्हापूरचे कुस्तीपटू श्रीपती खंचनाळे यांचं निधन”
कोरोना, कोरोनाचा बाप, कोरोनाचा आजोबाही सभागृहात घुसू शकणार नाही- सुधीर मुनगंटीवार