बीड : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी 5 जून रोजी बीडमध्ये मराठा मोर्चाची घोषणा केली आहे.
विनायक मेटे यांनी 5 जून रोजी काढल्या जाणाऱ्या मोर्चाच्या परवानगीसाठी अद्याप अर्ज केलेला नाही. त्यामुळे या मोर्चाला परवानगी नसल्याचं बीडचे जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी सांगितलं आहे. त्याबाबत मेटेंना विचारलं असता, सध्याच्या परिस्थितीत परवानगी मागितली असती तरी ती मिळेल याबाबत शाश्वती नाही. त्यामुळे परवानगी असो वा नसो उद्या बीडमध्ये मराठा मोर्चा निघणारच, असं मेटे यांनी यावेळी स्पष्ट केली.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर मेटे यांनी आज बीडमधील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते.
महत्वाच्या घडामोडी –
अनलॉकच्या गोंधळावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांना शिस्त लावली पाहिजे- देवेंद्र फडणवीस
छत्रपती घराण्याचं काम लोकांना पेटवण्याचं नाही, तर न्याय देण्याचं- संभाजीराजे छत्रपती
मी 39 वर्षे शिवसेनेत होतो, मराठा आरक्षणाबद्दल शिवसेनेची काय भूमिका आहे, हे मला माहितीये- नारायण राणे