मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यामुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही. राज्य सरकारला कुणालाही आरक्षण द्यायचं नाही, असा दावा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे. टीव्ही9 मराठीला प्रतिक्रिया देताना ते बोलत होते.
या सरकारला कुणालाही आरक्षण द्यायचं नाही. आहे त्यांचं आरक्षणही ठेवायचं नाही. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली ही भूमिका घेतली जात आहे. आरक्षणाची मागणी गेल्या अनेक वर्षापासूनची आहे. पवार सत्तेत होते, मुख्यमंत्री होते, तेव्हापासून आरक्षणाची मागणी होत आहे. पण मराठा समाजाला आरक्षण द्यावं, असं पवारांना कधीच वाटलं नाही. यावरून त्यांची भूमिका समजून येते, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.
दरमयान, आता बहुजन समाज या अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही गोपीचंद पडळकर यांनी यावेळी दिला आहे.
महत्वाच्या घडामोडी –
‘येडं पेरलं अन् खुळं उगवलं’ अशी ठाकरे सरकारची गत झाली आहे- गोपीचंद पडळकर
मराठा समाजाच्या हिताचा खून ठाकरे सरकारने केला; आशिष शेलारांचा हल्लाबोल
शरद पवारांमुळे मराठा आरक्षण मिळालं नाही, या सरकारला कुणालाच आरक्षण द्यायचं नाही- गोपीचंद पडळकर
“मातोश्रीने आमच्यासाठी दरवाजे बंद केले, आम्ही ‘मातोश्री’वर जाणं बंद केलं नाही”