अनेकजण डोळे लावून बसले होते, पण…; मुख्यमंत्र्यांचा भाजपला टोला

0
310

मुंबई : कोरोनाच्या संकटावरून आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

गेल्या 28 नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडीने एक वर्ष पूर्ण केले आहे. हे सरकार आज पडेल, उद्या पडेल म्हणून अनेकजण डोळे लावून बसले होते. पण सरकार पडलं नाही, विकास करत आणि राजकीय हल्ले परतवत या सरकारने एक वर्षे पूर्ण केलं आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोला लागवला आहे.

दरम्यान, मी जेव्हा जेव्हा तुमच्याशी बोलतो तेव्हा तुमच्या घरातील व्यक्ती असल्यासारखंच बोलतो. ते तुम्हालाही माहीत आहे. मी या खूर्चीवर बसलो आहे. त्यामुळे तुमच्या विश्वासाला तडा बसू देणार नाही, असंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

भाजपमधील 70 टक्के आमदार हे राष्ट्रवादीचेच- छगन भुजबळ

“ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणाची पावती सोनिया गांधीनीच दिली”

विकासाशी शत्रू सारखे वागून महाराष्ट्र द्रोह का करताय?; आशिष शेलारांचा सवाल

“राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांचं निधन”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here