आमदारकीसाठी अनेकजण इच्छुक होते, पण प्रत्येकाला संधी देणं शक्य नाही- जयंत पाटील

0
155

मुंबई : महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या नावाची यादी काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सादर केली. दिलेल्या यादीवर 15 दिवसांत राज्यपालांनी निर्णय घ्यावा, अशी विनंती आम्ही राज्यापालांना केली आहे., असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तसेच जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

आमदारकीसाठी अनेकजण इच्छुक होते. पण प्रत्येकाला संधी देणं शक्य नाही. ज्यांना संधी मिळाली नाही ते नाराज असणं स्वाभाविक आहे. पण त्यांची नाराजी आम्ही दूर करू, असंही यावेळी जयंत पाटील म्हणाले.

दरम्यान, राज्यपाल लवकरच यादीला मंजुरी देतील असा विश्वासही जयंत पाटलांनी यावेळी व्यक्त केला.

महत्वाच्या घडामोडी-

आता तरी सत्तेचा माज सोडून मराठा तरूणांच्या भविष्याचा विचार करा, अन्यथा…; चंद्रकांत पाटलांचा सरकारला इशारा

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर स्पष्टवक्ता आहेत, त्यांचा महाराष्ट्राला नक्कीच फायदा होईल- संजय राऊत

तज्ञांच्या समितीपेक्षा सचिन सावंत यांना जास्त अक्कल आहे का?- आशिष शेलार

“पंढरपूर-मुंबई आज मराठा आक्रोश मोर्चा”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here